फास

फास
------
पुन्हा एकदा पहिल्या सारखी
डोळ्यात बघून हास‌ ना
लांबसडक हातांचे त्या-
गळ्यात फास घाल नाऽऽ
काय केले म्हणजे होईल
तुझी माळ त्वरित गुंफून
थोडे रडू?जास्ती रडू?
दाखवू रडूऽऽन?..
मान सुध्दा उचलत नाहीस
काय तुला म्हणायचे?..
अश्शा वेळी सांग बरे‌
कोणते गाणे म्हणायचे?..
हळूच हसलीस गालावरती
आणखी थोडी थां नाऽ
फास तुझे घट्ट आवळून
एकदा मारुन टाक ना..!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७