पाप वग्गो९(पाप वर्ग

पाप वग्ग ९(पाप वर्ग)

पाली-मराठी काव्यानुवाद

--------------------------------- 

११६.

अभित्थरेथ कल्याणे पापाचित्तं निवारये |

दन्घं हि करोत पुन्यं पापस्मि रमती मनो ||९.१ 

करा पुण्य-कर्म झणी खरा हाच एक धम्म
होता विलंब घडते सदानकदा पापकर्म 

११७.

पापंचे पुरिसो कयिरा न तं कयिरा पुनप्पुनं |

न तम्हि छनदं कयिराथ दुक्खो पापस्स उच्चयो ||

पाप एकदा घडले घडू देऊ नये पुन्हा
चित्त पापात रमता दु:खभोग पुन्हा पुन्हा

११८.

पुन्यंचे पुरिसो कयिरा कयिराथेन पुप्पुनं 

न तम्हि छन्दं कयिराथ सुखो पुन्यस्स उच्चयो ||९.३ 

पुण्य एकदाच नको पुण्य वारंवार करा
पुण्य कर्मात रमले चित्त सुखाचाच झरा

११९.

पापोपि पस्सति भद्रं याव पापं न पच्चति |

यदाच पच्चति पापं अथ पापो पापानि पस्सति ||९.४ 

फळ पापाचे दूर तोवरी
पुण्य समजुनी पाप करे
फळ पापाचे मिळता भिऊनी
पापा पासुन दूर पळे

१२०.

भद्रोपि पस्सति पापं याव भद्रं न पच्चति |

यदा च पच्चति भद्रं अथ भद्रो भद्रानि पस्सति ||९.५ 

फळ पुण्याचे दूर तोवरी
पुण्य वाटते पाप तुला
फळ पुण्याचे मिळता दिसतो
पुण्याचा हा मार्ग भला

१२१.

मावमंन्येथ पापस्स न मं तं आगमिस्सति |

उदबिन्दुनिपातेन उदकुम्भोपि पूरति ||९.६ 

पाप कधी शिवणारच नाही
भ्रमात असल्या राहू नको
थेंबे थेंबे तळे साचते..
तळ्यात बुडशील झोपू नको

१२२.

मावमन्येथ पुन्यस्स न मन्तं आगमिस्सति |

उदबिन्दुनिपातेन उदकुम्भोपि पूरति |

पूरति धीरो पुन्यस्स थोकथोकम्पि आचिनं ||९.७ 

घडेल केंव्हा पुण्य म्हणोनी
उगा मानसी कुढू नको
थेंबे थेंबे तळे साचते
धीर कधीही सोडू नको

१२३.

वाणिजो व भयं मग्गं अप्पसत्थो महध्दनो |

विसं जीविततुकामो व पापानि परिबज्जये ||९.८

व्यापाऱ्याला चोर नको
जगणाऱ्याला वीष नको
पुण्याची ईच्छा त्या पुरुषा
पापाची ती वाट नको

१२४.

पाणिम्हि चे वणो नास्स हरेय्य पाणिना विसं |

नाब्बणं विसमन्वेति नत्थि पापं अकुब्बतो ||९.९ 

नाही जखम हाताला
भिती विषाची कशाला?
नाही आसक्ती कोठली
पाप घडेल कशाला ?

१२५.

यो अप्पदुद्ठस्स नस्स दुस्सति 

सुध्दस्स पोसस्स अनंगणसा |

तमेव बालं पच्चेति पापं 

सुखुमो रजो पटिवातं व खित्तो ||९.१० 

निंदता निर्मळ पुरुषाला
निंदेचे पाप लागते
वाऱ्यावर उडता धूळ
धुळीने सर्व माखते

१२६.

गब्भमेके उप्पज्जन्ति निरयं पापकम्मिनो |

सग्गं सुगितिनो यन्ति परिनिब्बन्ति अनासवा ||९.११

गर्भात जन्मतो कोणी
कोणी नरकात जातसे
सुगतीस स्वर्ग आणि
अनासक्ता निर्वाण असे

१२७.

न अनतलिक्खे न समुद्दमज्झे

न पब्बतानं विवरं पविस्स |

न विज्जति सो जगतिप्पदेसो 

यत्थट्ठितो मुंचेय्य पापकम्मा ||९.१२

१२८.

न अन्तलिक्खे न समुद्दमज्झे 

न पब्बतानं विवरं पविस्स 

न विज्जती सो जगतिप्पदेसो 

यत्थट्ठितं नप्पसहेय्य मच्चू ||९.१३

नभात सागरी किंवा
गुहेत पर्वतात जा
पापाचे फळ तुजला रे
भोगणे क्रमप्राप्त रे

नभात सागरी किंवा
गुहेत पर्वतात जा
सावली सारखे तुझिया
मरण हे चालते सवे
©रमेश यशवंत वाकनीस©

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७