प्रिया
प्रिया
------
काय सांगावे कुणाला
कशी आहे माझी प्रिया
तिला नाही काया,तिची
सर्वदूर छाया..
तिचे बोलणे:निशचल
खोल डोहाची शांतता
तिचे चालणे ज्ञानाच्या
पायी लोळते अहंता
तिचे काय सांगू स्वप्न
तीच आहे एक स्वप्न
तिच्या प्रीतीची घागर
एक समुद्र अपूर्ण
शोधशोधतो मी तिला
तीही मला ह्दयात
तिच्या जन्माच्या तृषेत
जन्म माझेही अनंत
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment