झुळ्ळुक

झुळ्ळुक
-----------
धट्टीकट्टी बनेल हट्टी
झुळ्ळुक जशी वाऱ्याची
उंच उंच आकाशातिल
सांज शकुन ताऱ्याची..
सांज शकुन ताऱ्याची तू
फळत्या फुलत्या बागांची
राम राईम साईम सुट्ट्योऽ
भलत्या लोभा रागांची..
भलत्या लोभा रागांची तू
मोती शुभ्र दातांची
च्याऊ म्याऊ कच्च्या खाऊ
प्रेमाच्या ग पापांची..
प्रेमाच्या ग पापांची तू
भोळ्या भूल थापांची
हातोहात फसवून होशिल
हेतूशून्य वाटांची तू..!!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७