मी

मी
----
केसात मोकळ्या राणी
मी कसा गुंतुनी पडलो
विस्मृत कळ्यांची स्वप्ने
स्मृतीत घेवून निजलो
मलमली तिच्या पदराशी
कां विचार खेळत होतो?
कोसळत्या गगनी माझ्या
मी चंद्र होवुनी फुललो
कुब्जेचे टिपले अश्रू
गालावर ठेवून ओठ
मीरेच्या पेल्या मध्ये
घननिळा होवुनी उरलो
ही म्हण,"तुझीच आहे
हो नसेलही खोटे ते
मी सहस्त्रसोळा मधुनी
आईपण शोधित फिरलो
लोटली युगे पण म्हणती
राधेचा केवळ कृष्ण-
मी तसा उखाणा घालुन
साऱ्यांना छळूनी हसलो
स्मृतीत विस्मृती माझी
घेवून जशी आलीस
केसात मोकळ्या राणी
मी खरा मोकळा झालो.
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७