पंडित वग्ग ६

पंडित वग्गो५(पंडित वर्ग)

पाली-मराठी काव्यानुवाद 

---------------------------------

७६.

निधीनं व पवत्तारं यं पस्से वज्जदस्सिनं |

निग्गय्हवादिं मेधाविं तादिरां पण्डितं भजे ||६.१

संयमी सदैव जो जागृतीत राहतो
दोष दाखवून तुझे भले कशात सांगतो
अशाच पंडिता सवे जन्म हा व्यतीत कर

७७.

ओवदेय्यानुसासेय्य असब्भा च निवारये |

सतं हि सो पियो होति असतं होति अप्पियो ||६.२

उपदेश करे सन्मार्ग दाखवी
प्रिय तो सज्जना ,अप्रिय दुर्जना

७८.

न भजे पापकू मित्ते न भजे पुरिसाधमे |

भथेथ मित्ते कल्याण भजेथ पुरिसुत्तमे ||६.३

वाईट अधम पुरुषांशी मैत्री कधीही करु नये
भल्या उत्तम पुरुषांची कधी मैत्री सोडू नये

७९.

धम्मपीती सुखं सेति विपस्सन्नेन चेतसा | 

अरियप्पवेदिते धम्मे सदा रमति पंडितो ||६.४ 

धम्मरस पान करितो तो सुखी प्रसन्न राहतो
बुध्द-मार्ग अनुसरोनी पंडित रमतो सदा

८०.

उदकं हि नयन्ति नेत्तिका उसुकारा नमयन्ति तेजनं |

दारुं नमयन्ति तच्छका अत्तानं दमयन्ति पंडिता ||६.५ 

कालवे काढून पाणी हवे तसे वळविती
तसे मन वळवून पंडित कल्याण साधती

८१.

सेलो यथा एकघनो वातेन न समीरति |

एवं निन्दापसंसासु न समिन्यन्ति 

पण्डिता ||६.६ 

उभे वादळ-वाऱ्यात जसे अचल पर्वत
निंदा किंवा स्तुती मध्ये तसे अढळ पंडित

८२.

यथापि रहदो गम्भिरो विपसन्नो अनाविलो | 

एवं धम्मानि सुत्वान विप्पसीदन्ति पण्डिता ||६.७ 

जसा खोल जलाशय शांत आणिक निर्मळ
धम्मामृत सेवणारा पंडित जाण तू तसा

८३.

सब्बत्थ वे सप्पुरिसा चजन्ति न कामकामा लपयन्ति सन्तो |

सुखेन फुट्ठा अथवा दुखेन न उच्चावचं पंडिता दस्सयन्ति ||६.८ 

सर्वसंग परित्यागी संत ते शांत राहती
सुख-दु:खातही त्यांना षड्रिपू ना स्पर्शती

८४.

न अत्तहेतु न पस्सहेतु 

न पुत्तमिच्छे न धनं न रट्ठं |

न इच्छेय्य अधम्मेन समिद्धिमत्तनो 

स सीलवा पज्ञत्वा धम्मिको सिया ||६.९

स्वत:साठी नाही दुज्यासाठी नाही
पुत्र राज्य लोभ तिळमात्र नाही
असा माणूस जाणावा शीलवान न् धार्मिक

८५.

अप्पका ते मनुस्सेसु ये जना पारगामिनो |

अथायं इतरा पजा तीरमेवानुधावति ||६.१०

फार थोडीच माणसे भव पार करतात
बाकी सारीच केवळ काठाकाठाने जातात

८६.

येच खैसम्मदक्खाते धम्मे धम्मानुवत्तिनो |

ते जना पारमेस्सन्ति मच्चुधेय्यं सुदुत्तरं ||६.११

जो धम्म मार्गी करे धम्मानुकार
तो मृत्यूचेही करे राज्य पार

८७.

कण्हं धम्मं विप्पहाय सुक्कं भावेथ पंडितो | 

ओका अनोकं आगम्म विवेके यत्थ दरमं ६.१२

८८.

तत्रा मिरतिमिच्छेय्य हित्वा कामे अकिंचनो |

परियोदपेय्य अत्तानं चित्तक्लेसेहि पंडितो ||६.१३ 

भलाईची आस अभ्यास सायास
एकांत निवास अकिंचनी ध्यास
पंडित ठेवितो शुध्द आपुल्या मनास

८९.

येसं सम्बोधि-अंगेसु सम्मा चित्तं सुभावितं | 

आदान-पटिनिस्सगे अनुपादाय ये रता |

खीणासवा जुतीमन्तो ते लोके परिनिब्बुता ||६.१४ 

संबोधीच्या अंगागातुन
तनामनाने स्थिर झाला
तो त्यागी तो अनासक्त
रे प्राप्त असे निर्वाणाला
©रमेश यशवंत वाकनीस©

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७