अभंग

अभंग 
-------
विठ्ठल आकाश विठ्ठल धरती
मावळता रवी विठ्ठलची
मऊ मुलायम उन तो विठ्ठल
थंडगार छाया विठ्ठलची
पानापानातून तृणातृणातून
विठ्ठल साजिरा वाहतोकी
नदी डोहातून रुणझुणे विठ्ठल
क्षितीज अनंत विठ्ठलची
होईल अंधार विठ्ठलची आता
चंद्र नि चांदणं विठ्ठलची
झोपणारी फुलं विठ्ठल जाहली
जागणाऱ्या कळ्या विठ्ठलची
विठ्ठल सृष्टीला व्यापुनिया उरे
विठ्ठल चरणी लीन झालो)
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७