अभंग
अभंग १
----------
चंदन तोडून चंदन फोडून
सुवास मरत नाही नाही
नरा तुझ्या उरी असा आहे प्रेमा
द्वेषाने सरत नाही नाही
सत्य राखायाचे व्रत ज्याचे त्याला
लोकलाज भय नाही नाही
जुन्या जगी जरी जुने अनुभव
ज्ञान त्याचे जुने नाही नाही
जीवनाचे मर्म थोडक्यात जाण
ढळते ती श्रध्दा नाही नाही
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)
२०/११/८६
Comments
Post a Comment