रस्ता
रस्ता
------
इथे तिथे उभा राहतो
प्रतिक्षेतली निरर्थकता अवलोकीत
अपभ्रंश झालेल्या शब्दा प्रमाणे
मरण वापरतात लोक जगायचं
साधन म्हणून.
पानापानावर थारोळी मग-
तुझ्यामाझ्यातल्या समजुतीची
आपुलकीची,प्रेमाची..!
निनावी गर्दीच्या
कौतुक मिश्रीत हाभावांकडे
पाठ फिरवून
मी एकटाच टाळ्या वाजवतो
माझ्याच अपौरुषेय पुरुषार्थवर
खुष होवून..
दोन-चार कबुतरे
दचकून भुर्रर्रकन उडून जातात
शांततामय प्रदेशात..
रस्ते वहातच असतात
नेहमी सारखे..
भरगच्च..!!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment