बाल वग्ग ५
बाल वग्गो५(बाल वर्ग)
पाली-मराठी काव्यानुवाद
-----------------------------------
बाल वग्ग ५
६०
----------------
दीघ्घा जागरतो रत्ति दीघं सन्तस्स योजनं |
दीघ्घो बालानं संसारी सद्धम्मं अविजानतं |
सदाच जागत बसणाऱ्याला रात्र
वाटते लांबच लांब
थकलेल्या पायांना वाटे योजनही
शतयोजन लांब...
६१.
घरं चे नाधिगच्छेय्य सेय्यं सदिसमत्तनो |
एकचरियं दळ्हं कयिरा नत्थि बाले सहायता |
आपुल्या समान वा श्रैष्ठ
आपुल्याहूनी
भेटला न मित्र तर एकटा विहार कर
मूर्ख शत्रू जाण रे माणसा
विचार कर
६२.
पुत्ता नत्थि धनम्मथि इतिबालो विहंचति |
अत्ता हि अत्तनो नत्थि कुतो पुत्तो कुतो धनं |
माझा पुत्र,माझा पैसा घोकत
होतो मूर्ख पिसा
तूच स्वत:चा नाहीस तेंव्हा
पुत्र कशाचा अन् पैसा..
६३.
यो बालो मंचति बाल्यं पण्डितो वापि तेन सो |
बालो च पण्डितमानी स ये बालो ति वुच्चति |
मूर्ख समजतो मूर्ख स्वत:ला
जाण तिथे आहे ज्ञान
मूर्ख समजतो विद्वान स्वत:ला
मूर्ख तिथे आहे जाण
६४.
यावजीवम्पि चे बालो पण्डितं पयिरुपासति |
न धम्मं विजानाति दब्बी सूपरसं यथा |
जीवनभर जरी मूर्ख राहीला
संगतीत विद्वानाच्या
डांडरलेल्या डाळीला रस
तसा पारखा धम्म तया
६५.
मुहत्तमपि चे विज्ञू पण्डितं पयिरुपासति |
खिप्पं धम्मं विजानति जिव्हा सूपरसं यथा ||
विद्वानाच्या सवे राहीला
क्षणभर शाहणा माणूस
शिजलेली जशि डाळ चाखते
रसना...चाखे धम्मरस
६६.
चरन्ति बाला दुम्मेधा अमित्तनेव
अत्तना |
करोन्ता पापकं कम्मं यं होति कटुकप्फलं |
मूर्ख स्वत:चा होऊन शत्रू
पाप कर्दमी रमतो रे
त्या पापाच्या कडू फळाचा
धनी होवुनी बसतो रे
६७.
न तं कम्मं कत़ साधु यं कत्वा अनुतप्पति |
यस्स अस्सुमुखो रोदं विपाकं पटिसेवति |
असे कर्म करु नाही
ज्याने मन पसतावते
फळ रडत रडत त्याचे
भोगावे लागते
६८.
तंच कम्मं कतं साधु यं कत्वा नानुतप्पति |
यस्स पतितो सुमनो विपाकं पटिसेवति |
६९.
मधु' वा मंचति बालो याव पापं न पच्चति |
यदा च पच्चति पापं न पच्चति |
७०.
मासे मासे कुसग्गेन बालो भुंजेथ भोजनं |
न सो संखतधम्मानं कलं अग्घति सोलसिं |
७१.
न हि पापं कतं कम्मं सज्जु खीरं
व मुच्चति |
डहन्तं बालमन्वेति भसृमच्छन्नो व पावको |
पसतावत नाही मन
अशी कर्मेच करावी
मग प्रसन्न मनाने
फळे मधुर चाखावी
७२.
यावदेव अनत्थाय अत्तं बालस्स जायति |
हन्ति बालस्स सुक्कंसं मुध्दमस्स विपायतयं |
फळ नाही प्राप्त होत
पाप तोवर मधुर
फळ प्राप्त झाल्यावर
दु:ख-आसवांचा भार
७३.
असतं भावनामिच्छेय्य पुरेक्खारंच भिक्खुसु |
आवासेसु च इस्सरियं पूजं परकुलेसु च |
मूर्खाने जरी महिनो न् महिने
भोजन गवताचे केले
सद्धर्माच्या मार्गा मधले
त्याला ना काही कळले
७४.
ममेव कतमन्युन्तु गिही पब्बजिता उभो |
ममेवातिवसा अस्सु किच्चाकिच्चेसु किस्मिची |
इति बालस्स सड़्कप्पो इच्छा मानो च वड्ढति |
ताजे असते तोवर जसे
दूध ना नासते
तसे पापाचे फळही खूप
उशिरा मिळते
७५.
अन्या हि लाभूपनिसा अन्या निब्बानगामिनी |
एवमेतं अभिन्याय भिक्खु बुद्धस्स सावको |
सक्कारं नाभिनन्देय्य विवेकमनुब्रुहये |
मूर्खाचे ते ज्ञान त्याच्या
अनर्था कारण
नाश चांगुलपणाचा आणि
प्रजेचे मरण
मी भिक्षूंचा अधिपती होईन
पूजनीय मज सर्व समजतील
हा मूर्खाचा विचार त्याने
अहंकार बघ वाढत राहील
लाभाचा रस्ता आपुला नाही जाण
निर्वाण-पथावर दृढ श्रध्देने चाल
ना मान तुझा सन्मान तुझा,तू जाण
हा ज्ञानवृक्ष बघ मुळे चालली खोल
©रमेश यशवंत वाकनीस©
Comments
Post a Comment