पान

पान
-----
दूर दूर असलो तरी
जवळ घेऊन बसायचे
एक पान सोनेरी त्या
आठवणींचे जपायचे..
किती दिवस छान होते
घरीदारी लाड होते
ज्याच्यात्याच्या खांद्यावरती
गोजिरवाणे लबाड होते..
उठता बसता हसता खेळता
"आई आई" करायचे
बाबा जर्रा चिडल्यावरती
तिच्याच कुशीत शिरायचे..
अभ्यासाला बसता बसता
हळूच पेंगत पडायचे
एक बुटुक चिंचेचे ते
समोर कोण धरायचे?
कोण?काय?कुठे?कसे?
काहीच नाही कळायचे
दोन काळ्या डोळ्यांचे ते
पाते लखलख हसायचे..
लहान मुला सारखे कां रे
मोठ्ठेपणी रडायचे?
एक पान सोनेरी त्या
आठवणींचे जपायचे..!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७