चला पंढरीस जाऊ

भजन
-------
रंग भरत भरत
ताल धरत धरत
सूर सजत सजत
हरी पांडुरं गाऊ
चला पंढरीस जाऊ
हरी दुर्जना उतारु
हरी सज्जना निवारु
हरी गुरुंचाही गुरु
हरी नामात उध्दरु
चला पंढरीस जाऊ||१||
हरी प्रेमात भेटतो
हरी त्यागात उरतो
हरी सुखात कळतो
हरी दु:खात वळतो
हरी पांडुरंग गाऊ
चला पंढरीस जाऊ||२||
हरी सारखा आठवू
हरी सारखा साठवू
हरी अंतरी जागवू
हरी बाहरी दाखवू‌
हरी पांडूरंग गाऊ
चला पंढरीस जाऊ||३||
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा‌ धोंडा अंतरीचा) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७