आसपास तुझ्या

आसपास तुझ्या
-------------------
मी तुला शब्दाचे विश्व दिले
तेवढ्याच आपुलकीने तू मला
तुझ्या गळ्यातील स्वरांचे
आंदण दिलेस..
त्या धारा अंगावर घेत
मी अजूनही बसतो निवांत..
पाऊस..अनंत..निरंत..
हिरव्या पानांच्या कोवळीकेतून
मधेच तू जातेस डोकावून,हसून..
जुईच्या असंख्य चांदण्या
सांडतात सर्वदूर...
त्या वेचण्याचं,
सुवासात बुडायचं हे वेड..
ही कधीच न उतरणारी धुंदी..
उफ..!
तुझ्यापेक्षा तुझ्या चित्रांचीच मोहिनी माझ्यावर अधिक पडू देत
एखादी तरी लकेर
स्वत:च्याही न कळत
दुसऱ्यासाठी घेता येऊ दे..
एवढ्या एकाच सुखाच्या घटिकेसाठी-
मी दरवळत असतो
आसपास तुझ्या..
ठाऊक आहे कां तुला?
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७