प्रतीक्षा

प्रतीक्षा
------
प्रतिक्षेत झाले उभे झाड मौनी
सखे सर्व आहे नाहीस तू
स्वरांचा तुझ्या चंद्रगुच्छातला तो
तुरा खोवण्या कां न आलीस तू?
तुला स्वप्न देशातुनी हांक येते
नभी कोणत्या सांग रमलीस तू?
मला वादळे फूलपंखी मिळाली
मिठी प्राक्तनाची सोडवावीस तू..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७