शुभ्र पाप
शुभ्र पाप
-----------
आता फुलातही
नाही फुलायचे
नाही झुलायचे
झुल्यावर..
आता मौनातही
नाही बोलायचे
नाही तोलायचे
प्रेम कधी..
आता आसवात
नाही मळायचे
नाही ढळायचे
शुभ्र पाप..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment