प्रवासी
प्रवासी
--------
कुठे जायचे रेऽ
तुला सोडूनी मी
तुझे शब्द आलो
इथे जोडुनी..
तुझी सर्व झाडे
तुझी सावली गा
तुवा शुध्द बीजे
इथे पेरिली..
तुझी खोल शांती
मला कवळू दे
हा सख्या दीप
आता सुखे फुंकू दे
तुझ्या अंध:कारी
तमाची न रेखा
जगाचा तू आधार
वहा भार गाऽ
असा शब्द करुनी
प्रवासी निघाला
कुठे? सांग..
देहातुनी एकला..
©रमेश यशवंत वाकनीस©
{संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment