व्यथा

व्यथा
------
आता सखे पापण्यात ओलावते नभ
घेऊनिया जळायचे आयुष्यच उभं
भंडावून सोडते ही पोर रात-दिस
समजावू कसं तिला लागलं ग पिसं
वारा प्याली पावसाची गाणी अनावर
नागडीच नाचतात रस्त्यावर पोरं !
त्यात माझी खुळाबाई फार हासते गं
थांबवावी कलती ही दुपार कशी गं?..
शिकायचं वय तिचं घडायची चूक
विसरुन खेळू देत तहान नि भूक..!
आता कुठे सुरु झाली एक परीकथा..
पदराच्या खाली झाक तुझ्या-माझ्या व्यथा..!!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
२२/६/१९९२ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७