पैलतिरावर

पैलतीरावर
-------------
घरात अस्थि सायंकाळी
माझ्या आणिक
तुझ्या रेशमी गालावरती
दवदव टपटपते..
दव टपटपते फुलाफुलावर
तसा अनावर
ओथंबून ये आयुष्याचा
घन आकाशी..
घन आकाशी कोसळेचना
मी सरणावर
असा एकला जळत निघालो
पैल तीरावर..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७