बुडून जा नामात
भक्ती गीत
------------
अवती भवती समोर पाठी
दत्तात्रय साक्षात..
काय हवे तुज सांग आणखी
बुडून जा नामात ||ध्रु ||
भार तुला ना संसाराचा
देह-मनाच्या व्यापारांचा
चालविती ते फक्त चाल तू
भक्तीच्या मार्गात ||१||
हात कृपेचा सदैव माथी
जन्म तुझा प्रभू कार्यासाठी
तू तर केवळ निमित्त पडू दे
समिधा या यज्ञात ||२ ||
सुख सुख कोठे शोधित फिरसी
सुख आहे सद्गुरू पदासी
भाव धरुन इतुकाच उतर तू
भावातीत ध्यानात ||३ ||
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)
Comments
Post a Comment