कोध वग्गो१७(क्रोध वर्ग)

कोध वग्गो १७(क्रोध वर्ग)

पाली-मराठी काव्यानुवाद

----------------------------------

२२१.

कोधं विप्पजहेय्य मानं 

सञ्ञोजनं सब्बमतिक्कमेय्य |

तं नामरुपस्मिं अससज्जमानं 

अकिञ्चनं नानुपतन्ति दुक्खा ||१७.१

ना क्रोध ज्यांना अभिमान नाही
निरासक्त आणि जे बंध- मुक्त
ना दु:ख त्यांना न संताप शोक

२२२.

यो वे उप्पतितं कोधं रथं भन्तं न धारये |

तमहं सारथिं ब्रूमि,रस्मिग्गाहो इतरो जनो ||१७.२

रथ धावणारा जसा थांबवितो
तसा क्रोध आपुला जो शांतवितो
खरा सारथी मी त्यालाच म्हणतो
बाकी तसे फक्त लगाम धारी

२२३.

अक्कोधेन जिने कोधं असाधु साधुना जिने |

जिने कदरियं दानेन सच्चेन अलीकवादिनं ||१७.३

अक्रोध क्रोधास जिंकावयाला
साधुत्व दुष्टास जिंकावयाला
दानात कंजूष जिंकून घ्यावा
मिथ्यास सत्य बोलून जिंका

२२४.

सच्चं भणे न कुज्झेय्य दज्जाप्पस्मिपि याचितो |

एतेही तिहि ठानेहि गच्छे देवान सन्तिके ||१७.४

उठा ! क्रोध सोडा सदा सत्य बोला
कुणी मागता दानवृत्तीस जागा
ही तीन तत्वे आचारात आणता
निकट देवतांच्या वास तुमचा रहावा

२२५.

अहिंसका ये मुनयो निच्चं कायेन संवुता |

ते यन्ति अच्युतं ठानं यत्थ गन्त्वा न सोचरे ||१७.५

ठाऊक नाही हींसा जयाला
ठाऊक नाही असंयम जयाला
तयालाच अच्युत-पद प्राप्त होते
चिंता न त्रागा न शोक त्याला

२२६.

सदा जागरमानानं अहोरत्तानु सिक्खिनं |

निब्बानं अधिमुत्तानं अत्थं गच्छन्ति आसवा ||१७.६ 

अभ्यास सायास योगात मग्न
दिन-रात जागा ध्यानात मग्न
अशा साधकाचे विकार सरले
निर्वाण त्याला न दूर उरले

२२७

पोराणमेतं अतुल ! नेतं अञ्ञतनामिव |

निन्दन्ति तुण्हीमासीनं निन्दति बहुभाणिनं ||१७.७

बडबडा असो, मितभाषी कोणी
ठरतात पात्र निंदेस दोन्ही
निंदेस केवळ अथवा स्तुतीस
ठरेल पात्र असा नाही कोणी

२२८.

न चाहु न च भविस्सति न चेतरहि विञ्ञति |

एकन्तं निन्दितो पोसो एकन्तं वा पसंसितो ||१७.८ 

बुध्दीवंत नि शीलवंत आचार शुध्द ठेविती
असे पुरुष देवांच्या स्तुतीस जाण पात्र तू

२२९.

यञ्चे विञ्ञू पसंसन्ति अनुविद्य सुवे सुवे |

अच्छिद्दवुत्तिं मेधाविं पञ्ञासीलसमाहितं ||१७.९

प्रकोपी फसते काया रहा संयम पाळुनी
आचार शुध्द ठेवावा दुराचार ते सोडुनी

२३०.

नेक्खं जम्बो नदस्सेव को तं निन्दितुमरहति |

देवापि नं पसंसन्ति ब्रह्मुनापि पसंसितो ||१७.१० 

प्रकोपी फसते वाणी रहा संयम पाळुनी
आचार शुध्द ठेवावा दुराचारास सोडुनी

२३१.

कायप्पकोपं रक्खेय कायेन संवुतो सिया |

कायदुच्चरितं हित्वा कायेन सुचरितं चरे ||१७.११

प्रकोपी फसते चित्त रहा संयम पाळुनी
आचार शुध्द ठेवावा दुराचारास सोडुनी

२३२.

वचीकोपं रक्खेय्य वाचाय संवुतो सिया |

वची दुच्चरितं हित्वा वाचाय सुचरितं चरे ||१७.१२ 

काया वाचा मनाचा जो पाळावा  संयम सदा

२३३.

मनोपकोपं रक्खेय्य मनसा संवुतो सिया | 

मनोदुच्चरितं हित्वा मनसा सुचरितं चरे ||१७.१३ 

मनाचा संयम भला सत्कर्मी मन हो भले 

२३४.

कायेन संवुता धीरा अथो वाचाय संवुता |

मनसा संवुता धीरा ते वे सुपरिसंवुतो ||१७.१४ 

जाणावा पुरुष तो पूर्ण संयमी धीर तो खरा 
©रमेश यशवंत वाकनीस©





Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७