स्ट्रेंजर
स्ट्रेंजर
--------
तू पुन्हा पाहिलंस वळून
पुन्हा विचारलंस काय करु?
हे बघ,घराभोवती विषारी कुंपण
तूच तुझ्या हातानं घातलंस-
बघतोस काय?
ही फुलं आहेत पदरात
जास्वंद..गुलाब..जाई..मोगरा रातराणी-
काही बोलू नकोस न् बघू नकोस
काळोखातून मीच आणलेय तुला
सुर्यस्नानासाठी
सगळं कळून न कळल्याचा आव..
ओठ वाकडा झालाय तुझा
पहा आरशात एकदा..
हसतोयस काय?
प्लीज रिती कर ती टोकरी.
रिती कर..
तस्सा गेलास.
आता मी हसायचं तरी कसं?
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment