नवे गीत ओठी
नवे गीत ओठी
------------------
नव्या वादळाचे नवे गीत ओठी
नवे सूर्य पोटी तुझ्या साजणी
अनंता घरी पाळणा हालताना
उभा अंत झाला विरागी मुनी
दिशांची मिळाली जरी आज बोटे दहा.ओंजळीला पडती उणी
इथे सूर्य आणि तिथे दूर नौका
बुडे..विश्व खेळ तुझ्या अंगणी
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment