पावरी
पावरी
--------
दूर गेल्यावरी
सूर झाल्यावरी
शोधिते पावरी..राधिका बावरी
नाद वेळूतला
नाद श्वासातला
नाद नादातला.. पूर्ण नादावला
कृष्ण आहे कुठे?
कृष्ण नाही कुठे?
कृष्ण प्रश्नात या-प्रश्न कृष्णात कां?
कृष्ण तू कृष्ण मी
कृष्ण झाल्यावरी
दूर झालो तरी..
कृष्ण ओठावरी..राधिका पावरी..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment