तट

तट
----
या प्रचंड घुमटाखाली
य:कश्चित मानव आला
प्रतिसृष्टी निर्मायाला
सृष्टीचा वैरी झाला.
नाहीपण त्याचे सारे
आहेवपणातच मेले
कवटीतिल चंद्रस्वरांनी
मेंदूचे लोणी थिजले.
भावूक मनाला त्याच्या
झोपेची आदिम तृष्णा
स्वप्नातच बरळत धावे
कालिंदी, 'कृष्णाऽ कृष्णाऽ
पलिकडे तटावर माझ्या
भडकली चितेची ज्वाला
प्राचीवर जन्मा आली
विश्वाची सुंदर बाला.
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७