चाफा ७

चाफा ७
----------
चाफ्याची सारी गाणी
मी तिच्याचसाठी लिहीली
परकेपण देऊन मजला
ती ओळींमागे गेली..!
हा शोध तिच्यातिल माझा
शब्दांचे चेटूक नुसते
मांडीवर पडुनी तान्हे
आईच्या नेत्री हसते..!
बोलते कुणाशी कोण?
हे कसे वदावे कोणा?
राधेच्या अधरावरती
कृष्णाचा जुना उखाणा..!
हा अस्ताईचा वारा..
चाफ्यावर पिवळे उन
प्रस्थान ठेवण्याआधी
हासलो पान उलटून..!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७