चाफा ९

चाफा ९
-------
आत्त तिथे अंगणात
तिन्हीसांज उतरली असेल
आणि चाफ्यावर अवेळ..
ती:असेल नसेलच्या उंबरठ्यावर
घोड्यांच्या टापांचे आवाज-
प्रथम मोठे मग अस्पष्ट होत होत
दूर अनंताच्या
किनाऱ्याकडे जाणारे..
अश्वत्थाम्याच्या जखमेचा अंधार
सर्वत्र पसरुन पारावर येवून
बसला असेल-
हजारो प्रकाशवर्षांची दाढी खाजवीत विचारेल,
"तेल आहे कां रे बाबा?"
नक्षत्रांनी खच्चून भरलेलं आकाशही-
असं भणंग झालेलं पाहून
शापित नगराच्या
रस्त्यारस्त्यावर तिचीही पावलं
भटकत राहिली असतील
त्याच्या पावलात विलीन होत.
आत्ता तिथे अंगणात कुणीच नसेल
चाफ्यावर,अवेळ.
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह,:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७