भेट

भेट
-----
कुठे ठरलेल्या असतात
या भेटी?
आणि खरंच कुणासाठी
जगत असतो आपण?
इथे तिथे गुंतत राहतो
हा जीव
मुलामाणसात
फुलापानात..
उन्हातान्हात भटकताना
थंडी पावसात भिजताना
सायं वाऱ्यावर झुलताना
मोहिनी असतेच तुझी
तुझ्या स्वप्नांची..!
चंद्र कासाविशीचे हे गाणे
रस्तोरस्ती विखरत जाताना
आजही एकाकी नाही मी..
एक प्रात:स्मरणीय नाव
प्रेमाचा एक गाव..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७