तुझी पाऊले

तुझी पाऊले
--------------
तुझी
पाऊले पडती तेथे
फुलते यौवन,फुलते जीवन
फुलाफुलातुन
कळ्याकळ्यातुन
तुझ्याच हांका तुझाच डंका
मी येऊ कां? मी येऊ कां?
येणाऱ्या जाणाऱ्या छळते
मळलेल्या वाटेला हसते
पिकलेल्या पानांना कळते
पान
पान
मग
गळून
पडते..
झाड डवरते..मन हिर्वळते
शिरी घेऊनी तुझी पाऊले..
तुझी पाऊले
लक्षलक्ष ती मला पहाया
अलक्ष डोळे
अथांग काळे
कधी मिळाले? कुणा कळाले?
तू-मी
तू- मी
द्वैत पळाले.. द्वैत पळाले..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७