नृत्य

नृत्य
-----
ओल्या
आठवणींच्या,
साऱ्याच खुणांचे चाळ
तिने पायात बांधलेत
मृगतृष्णेच्या तालावर
ती जेंव्हा नाचते आणि नाचवते
अवघे विश्वच
तेंव्हा पुन्हा हिरवीगार होते
तीच पुरातन वेदना
तिच्या चापेगौरी आनंदाच्या सोनकळा..
यालाच प्रेम म्हणते ती
असेलही तसे,तसेच.
आत्ता इथे-
मी ऐकतो आहे
अथांग सागराचे
मौनसूक्त..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७