चित्र
चित्र
-----
ती येते
चौकटीतले चित्र पुसून टाकते
मी पुन्हा चित्र काढतो.
ती पुन्हा पुसते..
असे बरेच वेळा घडते.
मग मी चित्रातच एक चौकट
ठेवून देतो रिकामी..
"असं नाही वागायचं. सगळं सगळं
विसरुन जायचं..काय?"
पाण्यानं तरारलेले डोळे लपवता
येत नाहीत तिला..
"म्हणजे फक्त आठवायचं"
माझा नि:श्वास
असे रंग गडद होत जातात.
वाऱ्यावर उडणारा पदर तिचा बेभान
लय- तालावर नृत्यमान ती-
पंचप्रणांसकट..
मी पुसला गेलो असा.
काल,आज,उद्या..उद्याही कदाचित
हे झालं माझं-
तिचं काय झालं कुणास ठाऊक?
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment