हसत हसता मरु दे

हसता हसता मरु दे
------------------------
अश्शी फुले गोजिरवाणी
पानोपानी फुलू दे
अस्से काटे उरात माझ्या
रात्रं-दिवस सलू दे
नको नको म्हणतानाही
मागे मेघ भरु दे
भेगाळलेल्या मातीवरती
पहिला पाऊस पडू दे
पहिला पाऊस पडू दे
माणूस इथला घडू दे
डोळे भरुन पहात त्याला
हसता हसता मरु दे..!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७