तुझी सर्व गीते
तुझी सर्व गीते
------------------
गुलाबी गुलाबी
तिन्ही सांज झाली
पुन्हा याद राणी
तुझी जागली..
कुठे उंबऱ्याशी
कुणी दीप लावी
क्षणाची प्रतीक्षा
युगे चालली..
कसा बांध घालू
स्वरांच्या नदीला
तुझी सर्व गीते
तुला वाहिली..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment