पुफ्फ वग्ग ४
पुप्फ वग्गो४(पुप्फ वर्ग)
पाली-मराठी काव्यानुवाद
-----------------------------------
४४.
को इमं पठविं विजेस्सति यमलोकंच इमं सदेवकं |
को धम्मपदं सुदेसितं कुसलो पुप्फमिव पचेस्सति ||
देव दानवा सहित कोण हो
या पृवीला जिंकेल ?
फुलां प्रमाणे धम्मपदे ही
कोण पुरुष हो वेचेल ?
४५.
सेखो पठविं विजेस्सति यमलोकंच इमं सदेवकं |
सेखो धम्मपदं सुदेसितं कुसलो पुप्फमिव पचेस्सति ||
पृथा,देव नि यमलोकाला कोण पुरुष हो जिंकेल?
फुला प्रमाणे धम्मपदे ही
कोण पुरुष हो वेचेल?
पृथा,देव नि यमलोकाला ज्ञानवंत तो जिंकेल..
फुलाप्रमाणे धम्मपदेही ज्ञानपिपासू वेचेल?
४६
फेणूपमं कायमिम़ विदित्वा मरिचिधम्मं अभिसम्बुधानो |
छेत्वान मारस्स पपुपृफकानि अदस्सनं मच्चुराजस्स गच्छे ||
पाण्यावरचा फेस जसा अन्
सुवर्णमृगही जसा असार
तसेच जाणुन या शरीराला
प्राप्त करावे जीवन सार
४७.
पुप्फानि हेव पचिनन्तं व्यासत्तमनसं नरं |
सुत्तं गामं महोघो व मच्चु
आदाय गच्छति ||
फुला प्रमाणे कामभोग जो
वेचत केवळ रमलेला
तो जाणावा गाव झोपला
पुरात वाहून गेलेला
४८.
पुप्फानि हेव पचिनन्तं व्यासत्तमनसं नरं |
अतित्तं येव कामेसु अन्तको
कुरुते वसं ||
फुला प्रमाणे कामभोग जो
वेचुनही बघ अतृप्त
अतृप्तीतच मृत्यू त्याला
वश करुनी होतो तृप्त
४९.
यथापि भमरो पुप्फं वण्णगन्धं
अहेठयं |
पलेति रसमादाय एवं
गामे मुनि चरे ||
रंग गंध ठेवून सुरक्षित
भ्रमर फुलांचा मध सेवे
तसेच भिक्षूंनी गावातुन
भिक्षा मागत विहरावे
५०.
न परेसं विलोमानि न परेसं
कताकतं
अत्तनो व अवेक्रवेय्य कतानि
अकतानि च ||
पर-वचने परे-कृत्ये
पाहू वा ऐकूही नका |
स्वत:ची वचने,कृत्ये
पाहण्या ऐकण्या शिका ||
५१
यथापि रुचिरं पुप्फं वण्णवन्तं
अगन्धकं |
एवं सुभासिता वाचा अफला
होति अकुय्यतो ||
सुवास नसता सौंदर्य
कुसुमांचे निरर्थक
आचारात नसता सार
सुभाषितेही निरर्थक
५२.
यथापि रुचिरं पुप्फं वण्णवन्तं
सगन्धकं |
एवं सुभासिता वाचा सफला
होति कुब्बतो ||
सुवास मिळता सौंदर्य
फुलांचे वाढते जसे
आचारात दिसता सार
सुभाषित सार्थ होतसे
५३.
यथापि पुप्फरासिम्हा कयिरा
मालागुणे बहू |
एवं जातेन मच्चेन कत्तब्बंज्ञ
कुसलं बहुं ||
फुलांचे जसे हार गुंफावयाचे
तसे जन्म घेता पुण्य जोडावयाचे
५४.
न पुप्फगन्धो पटिवातमेति
न चंदनं तगरमल्लिका वा |
सतंच गन्धो पटिवातमेति सब्बा
दिसा सप्पुरिसो पवाति ||
असू दे चंदन तगर वा चमेली
सुवास उलटा वहात नाही
उलटा नि सुलटा वहात जाई
संत सुगंधास सीमाच नाही
५५.
चंदनं तगरं वापि उप्पलं
अथ वस्सिककी |
एतेसं गन्धजातानं सीलगन्धो
अनुत्तरो ||
तगर चंदनाचा सुगंध क्षणकाल
टिकतो
शीलवंताचा सुगंध चिरकाल टिकतो
५६
अप्पमत्तो अयं गन्धो
य्वायं तगरचनदनी |
यो च सीलवतं गन्धो
वाति देवेसु उत्तमो ||
जुई चंदनाची फुले रम्य
सुगंधही रम्य
सदाचाराचा सुगंध
मात्र आहे अनुपम्य
५७.
तेसं सम्पन्नसीलानं अप्पमादविहारिनं |
सम्मद्न्या विमुत्तानं
मारो मग्गं न विन्दति ||
शीलवान अन् निष्पाप
होता ज्ञान झाले मुक्त
त्यांच्या मार्गात मारही
नाही पाऊल ठेवित
५८/५९
यथा संकारधानस्मिं
उज्झितस्मिं महापथे |
पदुमं तत्थ जायेथ सुचिगन्धं
मनोरमं ||
एवं संकारभूतेसु अन्धभूते
पुथुज्जने |
अतिरोचति पद्न्याय
सम्मासम्बुद्धसावको ||
रस्त्याकडेच्या घाणीत
फुले सुगंधी फुलली
तशी आंधळ्या जनात
बुध्द पाऊले शोभली
*
©रमेश यशवंत वाकनीस©
Comments
Post a Comment