आमंत्रण
आमंत्रण
----------
तुझे
मृत्यूचे आमंत्रण स्विकारले
तेंव्हा वाटले-
आपण कोण जिंकणारे आणि हरवणारे?
सगळी प्यादी हातात असून
साधी एक खेळीही
आपली स्वत:ची असू नये ना?
तो बघ-
तुझ्या कानाशी बोलणारा कुणी तिसराच..
घेणारा न् देणारा?
तो ही तिसराच.
तू हात बांधून कां बसलायस?
खेळ-
पण थांब-
पुन्हा एकदा मला हा डाव
नीट मांडू दे
त्यालाही कळू दे
या खेळाची निर्हेतुकता..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment