प्रतीक्षा

प्रतिक्षा
---------
वाऱ्यावर पान हलतही नाही
डोळ्यातिल स्वप्न ढळतही नाही
ओठावर गाणे फुलतही नाही
प्रतिक्षेची रात सरतही नाही
नाही नाही नाही नाहीपण माझे
अहेवपणाचे एक झाले ओझे
ओझ्याखाली मन दबतही नाही
मुक्त आकाशात झेपावत नाही
प्रतिक्षेची रात सरतही नाही
रोज रोज तशा भेटी घडतात
छिन्नी हातोड्याचे घाव साहतात
पत्थरा पाझर फुटतही नाही अरुपाचे रुप भेटतही नाही
प्रतिक्षेची रात सरतही नाही
प्रतिक्षेची रात जागून काढीन
ह्रदय उघडे करुन ठेवीन
आसवे गाळीन मरण साहीन
परंतू जीवाच्या जीवना भेटीन
पार मी जाईन..प्रतिक्षा करीन..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७