प्राक्तन

प्राक्तन
---------
सर्वत्र भरुन येत असताना
आभाळ एकटं उदास होतं
तूझ्यावाचून तुझ्यासाठी वेचलेल्या
क्षणांचे मोहर गळूनही पडत नाहीत आणि बहलतही नाही झाड
ते असतं एका प्रदीर्घ प्रतिक्षेचं
केवळ साक्षी..
पावसाशीच वैर होतं तर
आलीस तरी कशाला इथे?
आता तुला जाता येणार नाही परत
सार्वकालिक सत्याच्या मार्गावरुन..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७