चांदणी

चांदणी
---------
चांदणी
दूर..
एकांत
एकात एक गुंतलेले
दोघे
तुझ्याकडे पाठ करुन
उभा ज्ञातापार तुझ्या अस्तित्वाचा आनंदवृक्ष
अरण्यरुदनाच्या सावल्या
तळ्यात मिसळलेल्या
आकाशाने गिळलेला तारकांचा समूह..
एक चांदणी‌ माझ्यापास
श्वासोच्छ्वास
पदंन्यास अनंताचा
अनंत..!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७