चाफा १०
चाफा १०
------------
सांजसकाळी चाफ्यावरती
किती लिहावी गीते
किती जपावे आयुष्याला
स्वप्न ओघळू जाते
तळहाताचा फोड तसे मी
कोड पुरविले ज्याचे
त्या प्रीतीच्या क्षणासभोती
पतंग खातो गोते
अदृष्टाची किनार घेवून
घन शब्दांचे आले
कुठल्या काळ्याभिन्न रात्रीचे
दु:ख उरी या सलते
अंगण पडले ओस इथे हे
झाड उभे एकाकी
उडून गेलेल्या राव्यांना
शोधित कविता फिरते
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान)
Comments
Post a Comment