अभंग

अभंग ५
----------
तारुण्याचे तुझ्या वाजले की बारा
वार्धक्याने डेरा टाकियेला
एकेक इंद्रीय निकामी होणार
डाॅक्टरही किती कामी यावा
भोग प्रारब्धाचे भोगावे सुखाने
घ्यायचे मुखाने नाम तुझे
देह जगविण्या सेवायाचे अन्न
मन हे प्रसन्न ठेवायाचे
वाचन चिंतन करीत मनन
जाणून घ्यायचे तत्व तुझे
तुझा घ्यावा श्वास तुझा उच्छवास
तुझाची सुवास शब्दा यावा
आता निरुपाय जाहला उपाय
भव सिंधू पार करावया
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७