नशा

नशा
-------
नवीन फुलतिल फुले उद्याला
जुनी आपसूक गळून पडतिल
घे डोळ्यांनी पिऊन अवघी
ही जगण्याची नशा गुलाबी..
आली आली म्हणता गेली
शोधायाचे कुठे तिला मी?
गालावरच्या स्मितामागे
समुद्र भरतो आहे पाणी..
अनंत ईच्छा,आशा माझ्या
पालवीत ती आली आणिक
मी ओठांशी नेता पेला
वीष जाहले अवघे अमृत..
तरी लागले वेड असे की
दिवसरात्रही मला कळेना
तिच्याच वाटेवरती आता
अंथरुन मी प्राण बैसलो..
तिला ठावकी नाही काही
हट्ट फुलांचा अजून घेते
ओंजळ भरली नाही जोवर
तिची,गीत हे माझे अधुरे..
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:पिवळा चाफा हिरवे पान) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७