कविता

प्रार्थना
--------
आत्मलोपाच्या पहाटे
शब्दांची ही श्रीमंत शाल
आपसूकच गळून पडेल..
आणि
भिक्षेचा हा कटोरा घेऊन
मी पुन्हा तुझ्या दारात उभा राहीन
तू देशील तेच पांघरीन,
तू देशील तेच लेइन,
तू देशील ते आणि तेवढेच खाईन,
तू म्हणशील ते-
आणि तेवढेच गाईन..
तू ठेवशील जिथे जसा-
तसाच राहिन..!
आत्मलोपाच्या पहाटे,
खरं म्हणजे तुला "तू" म्हणायला
"मी" शिल्लकच असणार नाही
फक्त एक नि:शब्द प्रार्थना
या संपूर्ण विश्वात भरुन राहिली असेल..
आत्मलोपाच्या पहाटे..!!
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७