गीत
हे नटेश्वरा
-----------
रंगनायका हे विनायका
हे नटेश्वरा..||ध्रु||
सकल विकल मूढ जनद
तिमिर हरत येई जलद
ज्ञानवंत हे अनंत
कोटीभास्करा..||१||
आत्मरुप तू सकार
निर्विकल्प,निर्विकार
सुखद,दु:खद संकटात
शांत निर्भरा..||२||
सान मुले तू आम्हास
दे महान कार्य ध्यास
दे यशात हाच वरद
हे शुभंकरा..||३||
रंगनायका,हे विनायका
हे नटेश्वरा...
©रमेश यशवंत वाकनीस©
(संग्रह:ओळखावा धोंडा अंतरीचा)
Comments
Post a Comment