कवळायाला
कवळायाला
कवळायाला विश्व निघालो
आणि मिळाली फक्त कोठडी
अंधाराच्या सीमेवरती
एक अहल्या टाहो फोडी
सगे सोयरे होतो आम्ही
असा न केला कोणी दावा
जो आला तो निघून गेला
एक एकटा आपुल्या गावा
या दु:खाच्या विश्वखसावर
शब्द पडावा अर्था आधी
पोकळीत मग त्या अर्थाचे
घुबड घुमावे होऊन व्याधी
आयुष्याचे दान हवे तर-
माग म्हणावे मरणासाठी
स्मशान नाही.जन्म मिळाला
तुला जगी या मुक्तीसाठी
कवळायाला विश्व मिळाली
तिची वेदना.प्रीत परंतू
मीच करंटा कवळुन बसलो
हाय! इथे ही फक्त कोठडी.
©रमेश यशवंत वाकनीस©
Comments
Post a Comment