आठवते
आठवते
अजून पहिली रात साजणी आठवते
कसे पेटलो होतो सारे..
आठवते..
हात दिला मी हाती तेंव्हा
कशी अबोली थरथरली..
विजा कडाडून उन्मळलो ते
आठवते...
अंबर झुंबर हसले होते
चंद्रकळा ही पाझरते-
कसे चांदणे फुलले होते
आठवते..
अंधाराच्या नग्न शिरावर
नाचत ज्या भिडल्या ज्वाला
त्या ज्वालांची सुमने लेऊन
पहाट झाली-
आठवते..
आठवते गऽ
आठवते..
उदयास्ताला आठवते
आठवते ग आठवते
मीलन पहिले आठवते..
Comments
Post a Comment