पानाआड

पानाआड
पानाआड नुसती सळसळ
विरळ धुरकट अंधार हळूहळू
एकसंध होऊ लागतो..
आणि
चव्हाट्यावर यायला लागतात
चंद्र-चांदण्याची गाणीऽऽ
शीळ घालत फिरु लागतात वारे
काचेचे पडदे रुणझुणतात..
मधे केवढा मोठ्ठा पाॅज-
किती आले? किती गेले?..
खिन्न हसू डोळ्यात तरळून..
ती विचार करत राहते,
आपल्याच उघड्या मांड्यांकडे पहात..मग एकदम..
पानाआडची सळसळ...
ऐकता ऐकता..
डाव्या कुशीवर कलंडते
अस्वस्थपणे..!!!

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७