स्पर्श

९
स्पर्श

हुशार एखादा कावळा असतो
चारचौघात उठून दिसतो
मेल्या नंतर म्हणून त्याच्या -
पिसालाही भाव येतो

बाकी रक्त सांडणाऱ्यांनो
तुमची देखील कमाल आहे..
आम्ही हाडे वाळवित फिरतो
मांस टाकून पुढ्यात हसतो
मेल्या नंतर आत्मे देखील
तुम्हालाच बहाल करतो..

आम्ही असे कां वागतो?
या प्रश्नाला उत्तर नाही
अखेर हा ज्याच्या त्याच्या
स्वत्वाचा प्रश्न‌ असतो

लक्षात ठेवा निष्पाप जीव
मारुन 'पुण्य' जोडता येते
आणि पुन्हा तरण्यासाठी
'पापच पाप' करता येते

घडणारे आपण आणि
घडवणारे आपण असतो
कां जगण्याला अर्थ नाही?
अर्थ देणारे आपण असतो

परागंदा अस्तित्वाचा
कण न् कण बाळसे धरतो
एखाद्याचा पुतळा किंवा
एखाद्याचा आवाज उरतो
शब्द उरतो , गंध उरतो
चैतन्याचा रसरसलेला
स्पर्श फक्त बदलत असतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७