१८ वारी
वारी
------
वाळवंटी चंद्रभागा
एकटी रे राहिली
सांग कोणी पांडुरंगा
पंढरी ती पाहिली..
सत्य पडताळून आले
थांबले घाटावरी
वाहूनी गेले तयांच्या
साक्षीला ही राहिली...
हा तुक्या ज्ञानेश्वराचा
घोष येथे चालला
ज्ञान गेले साथ त्यांच्या
ही अडाणी राहिली..!
पंचप्राणातून साऱ्या
वादळे घोंगावती
शांतीच्या उंबऱ्यात गर्दी
माकडांची जाहली..!
मरण झाले स्वस्त आता
आर्त टाहो ऐकण्या
पत्थरांची भोवताली
राऊळे ही माजली..!
व्यर्थ आलो,व्यर्थ गेलो
घेवूनी आयुष्य का?
ही दिशाहीन आज कोठे
सांग वारी चालली?..
कां दिसावी पांडुरंगा
पंढरी ती सांग ना-
शोषितांनी शोषकांची
'संस्कृती' जर तारीली..!!!
©रमेश यशवंत वाकनीस
('पूर' या पहिल्या संग्रहातून)
छानच... जय हरी
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete