१७ इरसाल
इरसाल
-----------
रोजच्या मरणाचं सोयरसुतक
आता राहिलं नाही
नवीन जन्मा विषयीचं औत्सुक्यही
आता संपलं आहे.
देह-मनाला कसं मस्त बाधीर्य
येत चाललंय..
आता,
आता मला वाटतं जगता येईल,
अवतीभवतीच्या दु:खांचा
त्रास होणार नाही
उलट त्याचं भांडवल करता येईल
कवितांसाठी,
माझ्या सुखासाठी.
त्यालाच मग म्हणतील कुणी
नवी जाणीव..क्रांतीचं तवज्ञान..
वगैरे..वगैरे..वगैरे..
मग पुरस्कार.. पैसा..प्रतिष्ठा.. येईलच की मागून..
हंऽ काही हरकत नाही-
बगला वर करण्याचं तत्वज्ञान
आहेच की-
कर्ता करविता तो..!!!
च्छ्याऽयऽलाऽऽ
©रमेश यशवंत वाकनीस
('पूर' या पहिल्या संग्रहातून)
Bhari
ReplyDelete